राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनवणार: खडसे

0

जळगाव:आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागताला उत्तर देताना एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, समाचार समाजात अशा अनेक प्रवृत्ती आहेत ज्यांनी आघात केले आहे. अशा प्रवृत्तीं विरोधात संघर्ष करावा लागणार आहे. चांगल्या कामाची नोंद घेतली जाईल. तर नियम बाह्य कामासंदर्भात लढा द्यावा लागणार आहे. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी संघटितपणे राहून पक्ष वाढवायचा आहे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.