राष्ट्रवादीला खिंडार; सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याचा भाजपात प्रवेश

0

मालवण: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे काही आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळीक मानले जाणारे आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विध्यमान संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आज सोमवारी १० ऑगस्टला भजापात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुलाबराव चव्हाण यांनी मालवण येथील नीलरत्न बंगला येथे भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाअध्यक्ष राजन तेली,आमदार प्रसाद लाड,आमदार भाई गिरकर,आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार,अतुल काळसेकर,अशोक सावंत,दिलीप रावराणे,संजय चव्हाण, राजू राऊळ,सुदेश आचरेकर,महिला जिल्हाअध्यक्ष संध्या तेरसे,मालवण तालुका अध्यक्ष विजय केनवडेकर,आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीत झालेल्या प्रवेशामुळे जिल्हा बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

आज सकाळीच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले काही नेते पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक आहेत असे विधान केले होते, मात्र सिंधुदुर्गात सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्याला भाजपात प्रवेश देऊन भाजपानेच राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

Copy