राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक अशोक सिताराम लाडवंजारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. आगामी काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेता सामाजिक संतुलन राखण्याच्यादृष्टीने या पदासाठी योग्य पदाधिकार्‍याचा शोध घेणे सुरू होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाची ताकद वाढली आहे. शहरातही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटनेचा पुर्वानुभव असलेले अशोक सिताराम लाडवंजारी यांची निवड करण्यात आली आहे. अशोक लाडवंजारी हे एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.