राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते विकास पाटील शिवसेनेत

0

भडगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते विकास पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतल्याने मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रवेशाचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीवरही परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा गुढे येथील माजी सरपंच राजेंद्र देविदास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

उमेदवारीचे चित्र स्पष्ट – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत राजकीय पक्षाकडून उमेदवार निश्चित होत असतानांच इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यावर नाराज होवुन पक्ष बदल केला जात आहे. तालुक्यातील गुढे वडजी गटासह अन्य गटात देखिल मोठ्या प्रमाणात पक्ष बदलण्याचे सत्र सुरु असुन गुढे वडजी गटात सर्व तालुक्याचे लक्ष लागुन होते. नाराज झालेल्या उमेदवारांपैकी कोण कोणत्या पक्षाकडे जातो.आता या गटात राजकीय पक्षांचे उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.

सेना-भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा गुढे येथील माजी सरपंच राजेंद्र देविदास पाटील (राजु आबा) यांनी जिल्हाध्यक्ष उदयबापु वाघ, खा.ए.टी.नाना पाटील व तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा येथे भाजप कार्यालयात भाजपात प्रवेश केला.

तर विद्यमान राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य विकास पाटील व राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष संजय पाटील(भुरा आप्पा)यांनी आमदार किशोर पाटील तालुकाध्यक्ष दिपक पाटील,अनिल पाटील,गणेश परदेशी यांच्या उपस्थितीत गुढे येथे शिवसेनेत प्रवेश केला.

जसजसे राजकीय वातावरण तापायला लागेल. तसतसे अनेक राजकीय घडामोडी घडतील, अनेकांचे पक्ष बदल होतील. मात्र काही आपआपल्या सोयीने राजकीय गणिते मांडताना दिसून येत आहेत.