राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांनी ही सदीच्छा भेट असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Copy