रशियाचे राष्ट्रपती पुतिन आज भारतात

0

नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आज २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दरम्यान रशियाच्या एस-४०० वायु प्रतिरक्षा प्रणालीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

भारत यात्रेदरम्यान, पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वार्षिक भारत-रूस शिखर संमेलनात सहभागी होणार आहे. अमेरिकेने इराणवर लावलेल्या प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची स्थिती सोबतच विविध द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर हे दोन्ही नेते चर्चा करु शकतात. तसेच दोन्ही देशातील व्यापार, गुंतवणूक, संपर्क, ऊर्जा, अंतराळ, पर्यटनसहित विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्यादृष्टीने विचार करतील.

भारत-रूसमधील १९व्या शिखर संमेलनादरम्यान दोन्ही नेते अमेरिकेने रूसच्या रक्षा कंपनीवर लावलेल्या प्रतिबंधांवर आपली भुमिका स्पष्ट करू शकतात. मात्र,पुतिन यांच्या भारत यात्रेचा मुख्य उद्देश एस-४०० वायु प्रतिरक्षा प्रणाली करारावर स्वाक्षरी करणे हा असून, हा करार ५ अरब डॉलरपेक्षाही जास्त रकमेचा असणार आहे, अशी माहिती रूसच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने माहिती दिली. या करारामुळे अमेरिकेच्या काउंटरिंग अमेरिका एडवर्सरीज थ्रू सँक्शन अॅक्टचे उल्लंघन होईल. मात्र यामुळे, या अॅक्टपासून रूसला सुटका मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान राष्ट्रपती पुतिन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अधिकृत चर्चा करतील. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नुकत्याच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भारत-रूस इंटर-गवर्नमेंटल कमीशन ऑन टेक्निकल इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या २३ व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रूसच्या दौऱ्यावर गेल्या होत्या.

पुतिन आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींना भेटतील. शुक्रवारी भारत रूस शिखर संमेलनाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन करारांचे आदान प्रदान होईल. यानंतर दोन्ही नेते संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देतील. दरम्यान, पुतिन शुक्रवारीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. तसेच, ते प्रतिभावंत मुलांसोबत परिसंवादही करणार असून, भारत रूस व्यापार बैठकीलाही संबोधित करतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.