राष्ट्रपतींच्या पत्नी स्वतःच शिवतायेत गरिबांसाठी मास्क

0

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यादेखील कोरोना विरोधातील लढाईसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या स्वतःच गरिबांसाठी मास्क शिवत आहेत आणि कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचा संदेश देत आहेत.

प्रथम महिला सविता कोविंद यांनी बुधवारी कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान दिले. प्रेसिडेंट इस्टेट येथील शक्ती हाट येथे त्यांनी स्वतःच्या हाताने मास्क शिवले. त्याच्या या योगदानातून, वैश्विक आणि राष्ट्रीय संकटांचा सामना एकत्र येऊनच केला जाऊ शकतो, हा संदेशही लोकांपर्यंत जातो. येथे शिवण्यात येणारे मास्क दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाच्या विविध शेल्टर होम्सना वितरित केले जात आहेत.

Copy