राष्ट्रपतींचे अनोखे रक्षाबंधन; कोरोना योद्धांच्या हस्ते बांधली राखी

0

नवी दिल्ली: ‘रक्षाबंधन’ हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांची सेवा करत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना वॉरिअर्स बहिणींसोबत रक्षा बंधन साजरा केला. राष्ट्रपती भवनात रक्षा बंधन साजरा करण्यात आला.

कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर,नर्स,पॅरामेडिकल स्टाफ,सफाई कर्मचारी,अंगणवाडी ताई,आशा ताई,महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहेत त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. या हेतूने राष्ट्रपतींनी हा अनोखा रक्षा बंधन साजरा केला.

Copy