रावेर शहरात करभरणा थकविल्याने पाच गाळे सील

0

रावेर । नगरपालिकेचे कर थकवल्याने शहरातील पाच गाळे तर टेलीकॉम कंपनीचे एक टॉवर सिल करण्यात आल्याची कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती मार्च अखेर असल्याने मालमत्तेवरील कराची वसूली मोहिम जोरदार सुरु आहे स्वत: मुख्याधिकारी कर थकबाकीदारांकड़े जाऊन 31 मार्च पर्यंत भरणा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत सुमारे सव्वा कोटीचीं 70 टक्के वसूली झाली आहे. तर बाकी असलेल्या कडुन वसूली करण्याची कारवाई सुरु आहे.

पालिकेकडून सुरु आहे वसूली
नगरपालिका प्रशासनाकडून व्यवसायिक गाळे शॉपिंग मॉल, खुला भूखंड, विविध टेलीकॉम कंपन्यांचे टावर, पाणी पुरवठा कर, रहिवास मालमत्तेचे कर यासह इतर करांची वसूली प्रशासनाकडून सुरु आहे.

या गाळे, टेलीकॉम कंपनीला लावले सिल
दरम्यान शहरात दिवसभर विविध करांची वसूली जोरदार सुरु आहे. शहरातील माधव कृपा संकुलनातील पाच गाळ्याकड़े 1 लाख 30 हजार थकले आहे. तर छोरिया मार्केटवर असलेले टाटा कंपनीचे टेलीकॉम टावरकड़े 1 लाख 25 हजार थकल्याने सिल करण्यात आले आहे.या गाळे, टेलीकॉम कंपनीला लावले सिल
दरम्यान शहरात दिवसभर विविध करांची वसूली जोरदार सुरु आहे. शहरातील माधव कृपा संकुलनातील पाच गाळ्याकड़े 1 लाख 30 हजार थकले आहे. तर छोरिया मार्केटवर असलेले टाटा कंपनीचे टेलीकॉम टावरकड़े 1 लाख 25 हजार थकल्याने सिल करण्यात आले आहे.

यांचा होता सहभाग
पालिकेच्या कर वसूली पथकात मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदशनाखाली विद्युत् अभियंता सूरज नारखेड़े, कर अधिक्षक चंदन मेढे, रोखपाल गणेश महाजन, शिवाजी महाजन, युसूफ शेख, विनोद पवार, धोंडु वाणी आदींचा यावेळी सहभाग होता.

मार्च अखेर असल्याने नागरिकांकडे बाकी असलेले सर्व कर भरुन पालिकेला सहकार्य करावे आज केलेली कारवाई उद्या आपल्यावर होणार नाही यासाठी मालमत्ता कर ताबतोब भरणा करावा. कर थकबाकी असलेल्या पाच गाळे व एक टेलीकॉम कंपनी टॉवरवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. – राहुल पाटील, मुख्याधिकारी