रावेर रेल्वे स्थानकावरून गव्हाचा रॅक बंग्लोरला रवाना

0

रावेर : व्यापार्‍यांच्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनातर्फे व्यापार्‍यांसाठी 21 वॅगनचा रॅक उपलब्ध करून देण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू गहू त्यात भरण्यात आला 21 वॅगन असलेला गव्हाचा रॅक एसजीडब्ल्यूएफ (व्हाईट फिल्ड सॅटेलाईट गुडस टर्मिनल, बंग्लोर) रविवारी रात्री उशिरा बंग्लोरसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर 21 वॅगच्या मिनी रॅक मध्ये भुसा भरण्यात आला आहे हा रॅक चाळीसगावहून हसनला रवाना होणार आहे.

माल वाहतूक नियमांमध्ये बदल
रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक ते सर्वोतोपरी सहकार्य हे व्यापार्‍यांना केले जात आहे तसेच प्रशासनातर्फे व्यापार्‍यांना माल वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून जेणे करून व्यापार्‍यांना आपला माल पोचवण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

Copy