रावेर येथे 20 उमेदवारांनी दाखल केले अर्ज

0

रावेर । येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून मंगळवार 31 रोजी 20 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यामुळे तहसिल परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यात ऐनपूर-खिरवड गटात सुलोचना पाटील, रंजना पाटील, विवरा-वाघोदा गटात मुबारक तडवी, पाल-केर्हाळा गटात मानसी पवार, नंदा पाटील, निंभोरा-तांदलवाडी गटात नंदकिशोर महाजन, किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पंचायत समितीसाठी केर्हाळा गटात सुनिता पाटील, ऐनपूर – राजू सवर्णे, रविंद्र महाजन, जितेंद्र श्रीराम पाटील, पाल – रविंद्र महाजन, जनाबाई महाजन, गोंडू महाजन, तांदलवाडी – कविता कोळी, केर्हाळे बुद्रुक – धनश्री सावळे, खिरवड – जुम्मा तडवी, विवरा – अजाबराव पाटील यांनी अर्ज दाखल केले आहे.

भुसावळात एकमेव अर्ज तर यावलमध्ये 8 अर्ज
येथील तहसिल कार्यालयात साकेगाव गणातून लोधी शहनाजबानो रईसखान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केला आहे. यावल तालुक्यातील भालोद- पाडळसे गटातून नंदा दिलीप सपकाळे यांनी भाजपातर्फे, सुकदेव पुंजाजी बोदडे यांनी काँग्रेसतर्फे, भालोद गणातून लता भगवान कोळी यांनी भाजपातर्फे, पाडळसे गणातून रेखा बाबुराव सपकाळे यांनी काँग्रेसतर्फे, रुपाली शेखर तायडे यांनी काँग्रेसतर्फे साकळी गणातून दिपक नामदेव पाटील यांनी भाजपातर्फे तर साकळी- दहिगाव गटातून रविंद्र सुर्यभान पाटील यांनी भाजपातर्फे, हिंगोणे- सावखेडेसिम गटातून कमल शामराव मेघे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केले आहे.