रावेर येथील अपघातावर खा.सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले दु:ख

0

जळगाव: पपईने भरून जाणारी आयशर गाडी पलटी झाल्याने १६ जण जागीच ठार झाल्याची घटना किंनगाव जवळ घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे बोलले जात होते. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केन्हाळा व रावेर शहरातील आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

‘जळगाव येथे ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात १६ जण ठार झाले.ही घटना अतिशय हृदयद्रावक असून या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही प्रार्थना’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं खालीलप्रमाणे:
१) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (३० वर्ष)
२) सरफराज कासम तडवी (३२ वर्ष)
३) नरेंद्र वामन वाघ (२५ वर्ष)
४) डिंगबंर माधव सपकाळे (५५ वर्ष)
५) दिलदार हुसेन तडवी (२० वर्ष)
६)संदीप युवराज भालेराव (२५ वर्ष)
७) अशोक जगन वाघ (४० वर्ष)
८) दुर्गाबाई संदीप भालेराव (२० वर्ष)
९)गणेश रमेश मोरे (५ वर्ष)
१०) शारदा रमेश मोरे (१५ वर्ष)
११) सागर अशोक वाघ (३ वर्ष)
१२ ) संगीता अशोक वाघ (३५ वर्ष)
१३ ) सुमनबाई शालीक इंगळे (४५ वर्ष)
१४) कमलाबाई रमेश मोरे (४५ वर्ष)
१५) सबनूर हुसेन तडवी (५३ वर्ष)

Copy