रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेससाठी जिंकणे सहज शक्य

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासमवेत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची चर्चा

0

जळगाव – जिल्ह्यातील रावेर (raver) मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांना मानणारे मतदार आहेत. त्यामुळे सन 2024 च्या निवडणूकीत सुक्ष्म नियोजन केल्यास रावेर मतदार संघाची जागा काँग्रेससाठी जिंकून आणणे सहज शक्य असल्याचा विश्वास काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केला.

काँग्रेसचे (congress) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी राज्यात पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा निर्णायक भूमिकेत आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले या आक्रमक नेतृत्वाची निवड पक्षातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांचा सत्कारही डॉ. उल्हास पाटील यांनी केला.

संघटनात्मक चर्चा
यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय परिस्थीतीचा आढावा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केला. तसेच भाजपाविरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली आंदोलने, मोर्चे, जनसंघर्ष यात्रा यांचाही आढावा डॉ. पाटील यांनी सादर केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याशी चर्चा करतांना रावेर मतदारसंघाची जागा सुक्ष्म नियोजन केल्यास जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. आगामी काळात होणार्या निवडणुकांसाठी आणि पक्ष संघटना मजबूतीसाठी डॉ. उल्हास पाटील यांना सक्रीयतेने सहभाग घेण्याच्या सूचनाही केल्या.

Copy