रावेर बाजार समितीच्या बनावट पावती : दोघांविरोधात गुन्हा

सावदा : रावेर बाजार समितीच्या बनावट पावत्या छापल्या प्रकरणी सावदा पोसिलात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बैठकीत पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा निर्णय झाला. रावेर तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केळीची वाहतूक होते. यासाठी प्रत्येक ट्रककडून बाजार समिती 300 रूपये शुल्क आकारणी करते. 12 ऑगस्ट रोजी बाजार समिती कर्मचार्‍याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील चोरवड नाक्यावर एका ट्रक चालकाकडील पावतीची तपासणी केली असता त्यावर बाजार समितीचा शिक्का नव्हता. यामुळे शंका येताच त्याने ट्रक चालकास पावती कुठून फाडली? अशी विचारणा केली. चालकाने सावद्यातील एकाचे नाव सांगितले. यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले.

सावदासह आंदलवाडीच्या एकाविरोधात गुन्हा
बोगस पावती प्रकरणी रावेर बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून र जुनेदखान जफरखान (रा.सावदा) व आसिफ खलिल भाट (रा.आंदलवाडी ता.रावेर) यांच्या विरोधात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy