रावेर प्रभारी विस्तार अधिकार्‍यांचा अखेर पदभार काढला

रावेर : रावेरचे प्रभारी विस्तार अधिकारी हबीब तडवी यांचा रावेरचा पदभार जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी मंगळवारी काढला. तडवी यांना यावल पंचायत समितीत पूर्ण वेळ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी वरुन बदली झालेले हबीब तडवी यांना पुन्हा रावेर पंचायत समितीत प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून तीन दिवसांचा चार्ज दिला होता. हा पदभार काढण्यासाठी जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांनीदेखील नाराजी व्यक्त पदभार काढण्याचा सूचना केल्या होत्या. मंगळवारी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी रावेर पंचायत समितीचा अतिरीक्त पदभार काढून यावल पंचायत समितीत पूर्ण वेळ काम करण्याच्या आदेश दिले.