रावेर पेटले : दोन गटात दगडफेक ; वाहनांची जाळपोळ

0

रावेर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट समोरा-समोर आल्यानंतर कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याने दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक जण जखमी झाला तर यानंतर हिंसक जमावाने दुचाकींसह एका वाहनाला आग लावल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर जिल्हाभरातून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित असल्याने रात्री उशिरापर्यंत नेमक्या नुकसानीचा अंदाज कळू शकला नाही. जिल्हाभरातून पोलिस अधिकारी रावेर शहरात दाखल झाले आहेत. पोलिसांनी नागरीकांना कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Copy