रावेर पुरवठा विभागच्या सुस्त कारभाराबाबत तहसीलदारांना निवेदन

0

समस्या सोडविण्याची बसपा पदाधिकार्‍यांची मागणी

रावेर- रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या सुस्त कारभारासह अन्य प्रश्‍नांबाबत बहुजन समाज पक्षातर्फे तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील अनेक खेडयांमधील रेशन दुकानांबद्दल तक्रारी असून मोरगांव, रमजीपुर येथील अतिक्रमणे काढावीत तसेच प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांसमोर फलक लावावेत, साखरेसह रॉकेल दिवाळीपूर्वी गरीब जनतेला साखर द्यावी, प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थींची यादी त्वरीत मंजूर करावी तसेच पुरवठा अधिकार्‍यांनी कार्यालयात वेळ देवून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणीनिवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली.

यांच्या निवेदनावर सह्या
विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर जाधव, युवराज भालेराव, संतोष ढीवरे, रवींद्र रायपुरे, सदाशीव निकम, प्रेमचंद रायपूरे, सावन भालेराव, सभाबाई तायडे, प्रमिला तायडे, बेबाबाई तायडे, सुमनबाई तायडे, सुषमा लोखंडे, यशोदाबाई भालेराव, मंदाबाई तायडे, माधुरी तायडे, सयाबाई ठाकरे, कांताबाई तायडे, कल्पना गाढे यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष उपस्थित होते.