रावेर परिसरात पसरतेय थंडी तापाची साथ

0

रावेर । वातावरणात सध्या बदल होत आहे. यात कधी ढगाळ वातावरण, कधी थंडी तर कधी कडक तापमान यामुळे रोगराईची साथ फैलावण्यास पोषक वातावरण निर्माण होत असते. त्यातल्या त्यात दुषीत पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे भरीस भर म्हणून की काय शहरात ’फ्ल्यु’ ची साथ पसरलेली असून येथील ग्रामीण रुणालयात दरोरोज शंभरच्यावर रूग्ण आढळत येत आहे. बहुतेक रुग्ण हे शहरातील रहीवासी आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असून शहरात नियमितपणे साफसफाईसह शुध्द पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे.

पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
रावेर ग्रामीण भागात तसेच इतर ठिकाणावरुन सर्दी, खोकला, ताप तर काही प्रमाणात टायफाइडची लागण होत असल्याने रूग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी होत असून याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी खरबरदारी घेऊन उघड्या वरील पदार्थ, ठंड पदार्थ, खाने टाळावे तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे रावेर ग्रामीण रूग्णालयातर्फे कळविण्यात आले आहे.

असा होतो ’फ्ल्यु’
बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इंन्फेक्शन तयार होतो. त्यात उघड्यावरील पदार्थ सेवन केल्याने सर्दी, ताप व खोकला येतो असे आढळल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वेळीच उपचार करावा.

ग्रामीण रुग्णालयाच्या दरोरोजच्या ओपीडीमध्ये टॉयफाइड रुग्ण देखील आढळत असल्याने प्रशासनाची झोप उड़वणारी बाब आहे. दररोज तिसच्यावर टॉयफाइड रुग्ण येत असल्याने आरोग्यचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टॉयफाइड शक्यतो दूषित पाण्यामुळे होतो.