रावेर पं.स.शेष फंडाच्या वैयक्तीक लाभ योजनेत भ्रष्ट्राचार

निळे निशाणचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचा रावेर शहरातील पत्रकार परीषदेत गंभीर आरोप

रावेर : रावेर पंचायत समितीत तत्काली गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी शेष फंडाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आलातसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयात महापुरुषांचा अनादर करणार्‍यांना पंचायत राज समितीने तत्काळ निलंबित करण्याची मागणी आनंद बाविस्कर यांनी रावेर शहरात घेतलेल्या पत्रकार परीषदेत केला आहे.

नियम पायदळी : एकाच कुटुंबातील पाच जणांना लाभ
आनंद बाविस्कर म्हणाले की, निंबोल येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना पंचायत समितीने कायद्याची पायमल्ली करून लाभ दिला आहे तर 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेला पिकोफॉलची मशीन देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार खूप गंभीर असून भ्रष्ट्राचारासंदर्भात इतर माहिती देण्यास पंचायत समिती टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला तसेच या सर्व प्रकरणाला सत्ताधारी जबाबदार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.

गटशिक्षणाधिकार्‍यांचे निलंबन करा
पत्रकार परीषदेत पुढे बोलतांना बाविस्कर म्हणाले की, रावेर शिक्षण विभागाच्या कार्यालयात महापुरुषांचा अनादर झाल्याची मोठी घटना जिल्ह्यात पीआरसी आल्यानंतर घडली आहे. हा प्रकार खूप गंभीर असून या सर्व गोष्टींमुळे आमच्या भावना दुखावल्या असून शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी यांना जबाबदार धरीत निलंबन करावे, अशी मागणी पत्रकार परीषदेत निळे निशाण सामाजिक संघटनेनेतर्फे करण्यात आली.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेश तायडे, जिल्हा उपप्रमुख सदाशीव निकम, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे, तालुका उपाध्यक्ष सुधीर सैगमिरे, नारायण सवर्णे, शरद बगाडे, अरविंद भालेराव यांची उपस्थिती होती.

Copy