रावेर दंगल: परिस्थिती नियंत्रणात; तणावपूर्ण शांतता

0

रावेर : शहरात रात्री दोन गटामध्ये किरकोळ वादातून अचानक दगडफेक, जाळपोळ झाल्याची घटना घडली. यात समाज कंटकांनी तोडफोड करत विजांचा तारांची नासधूस करत वीजपुरवठा खंडित केला. शेवटी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आता परीस्थिती नियंत्रणात आली असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात तनावपूर्ण शांतता आहे.

पोलिस प्रशासने हाणून पाडला मोठा डाव

मन्यारवाडा, बारीवाडा शिवाजी चौक परिसरात तूफान दगड फेक जाळपोळ झाली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. समाज कंटकांनी शहरात हैदोस घालण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला.

घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, आमदार शिरिषदादा चौधरी, प्रांतधीकारी अजित थोरबोले, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे तळ ठोकुन होते.

रावेरला झालेल्या दंगलीमुळे दोन दिवस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २२ मार्चला रात्री ११ वाजता ही संचारबंदी उपविभागीय दंडाधिकारी डॉ.थोरबोले यांनी लागू केली असून ही 2४ मार्चच्या रात्री ११ वाजेपर्यंत कायम राहणार आहे.