रावेर दंगलीतील आरोपींबाबत माहिती देणार्‍यास पोलिस दल देणार बक्षीस

0

आरोपींनी खेड्या-पाड्यांसह शेत-शिवारात घेतला आश्रय

रावेर : रावेर शहरात दोन गटात उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी स्वतंत्रपणे सहा गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात यश आले असलेतरी अनेक आरोपी शहरातून पसार झाले आहेत. काही आरोपींनी नातेवाईकांकडे तसेच काहींनी रावेर तालुक्यातील शेती शिवारामध्ये/खेड्यामध्ये आश्रय घेतला आहे. पसार आरोपींबाबत माहिती देणार्‍या व्यक्तीस जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सदरची माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. माहिती कळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले 9821160633, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके 9665098309, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे 9823095524 , गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक बापू रोहम 9823019711 व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे 9403115152 तसेच कॉन्स्टेबल मंदार पाटील 9730302300 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

Copy