रावेर तालुक्यात वन्यजीव सप्ताहाचा अधिकार्‍यांना विसर

0

रावेर- वन्यजीव विभागाचा सोमवारपासून सप्ताह सुरू झाला असून याकडे दुर्लक्ष होत असल्याने वन्यजीव प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. कुठलाही प्रचार-प्रसार न करता सप्ताहाला लालफितीत गुंडाळून ठेवले जात आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. रावेर तालुक्यातील पाल निमड्या परीसरात मोठ्या प्रमाणावर अभयारण्य असून अनेक प्रजातीचे पशू-पक्षी जंगलात आहेत. जंगल सुरक्षित रहावे, पशू-पक्षांबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी आदिवासी बांधवांना विश्‍वासात घेऊन हा सप्ताह साजरा केला जातो मात्र ज्या विभागावर याची जवाबदारी आहे त्यांना विसर पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Copy