रावेर तालुक्यात मास्क विनाच बाहेर फिरणार्‍या दहा जणांवर कारवाई

0

रावेर : रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात मास्क वा रूमाल न बांधताच बाहेर पडणार्‍या दहा जणांवर तहसीलदार उषाराणी देवगुणे व नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. शुक्रवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे लॉकडाउनचे पालन करण्याच्या वारंवार सूचना करीत असताना ग्रामीण भागात त्याचे पालन होत नसल्याने सुरेश पाटील, डॉ.सुधीर पाटील, प्रवीण पाटील, बबलू महाजन यांच्यावर तहसीलदारांनी कारवाई तसेच संजय कोत्रे, संतोष महाजन, शेख कलीम, दीपक नाईक, शांताराम महाजन, नवाज तडवी या सर्वांवर प्रत्येकी 500 रुपये दंड प्रमाणे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी कारवाई केली. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळेदेखील उपस्थित होते. यावेळी नेहता व खिरवड गावांमधील धान्य दुकानात मोफत धान्य वाटप करताना पात्र कार्ड धारकांना धान्य व्यवस्थितरीत्या मिळते की नाही? याची निवासी नायब तहसीलदारांनी खातरजमा केली.