रावेर तालुक्यात बेकायदेशीररीत्या गावठी विक्री : चौघांविरुद्ध गुन्हा

0

रावेर : तालुक्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू बनवून विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी छापा टाकून हजारो लिटर कच्चे व पक्के रसायन नष्ट केले. याप्रकरणी चार जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मागदर्शनाखाली रावेर पोलिसांनी तालुक्यात अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू बनवून विक्री होत असल्याच्या ठिकाणी धडक कारवाई करत 22 हजार रुपये किंमतीची दारू व रसायन नष्ट केले.

चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा
या प्रकरणी संशयीत आरोपी बाबुराव देवचंद अटकाळे (रा.थेरोळा, ता.रावेर) याच्या ताब्यातून 12 हजार रुपयांचा मुद्देमाल तर छगन दयाराम आटकाळे (रा.थेरोळा) याच्या ताब्यातून क हजार रुपये किंमतीची दारू, इंदुमती युवराज अटकाळे (रा.थेरोळा) याच्या घरातून 750 रुपये किंमतीची दारू तसेच मुबारक महेबूब तडवी (रा.खिरोदा, ता.रावेर) याच्या घरातून 900 रुपये किंमतीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आले. चौघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कदम, हवालदार अर्जुन सोनवणे, हवालदार जितेंद्र नारेकर, हवालदार सतीश सानप, हवालदार जितेंद्र पाटील, कॉन्स्टेबल तुषार मोरे, कॉन्स्टेबल मनोज मस्के, कॉन्स्टेबल नयना वडनेरे यांनी कारवाई केली.

Copy