Private Advt

रावेर तालुक्यात जोरदार पाऊस ; वीज कोसळल्याने एक जण व्यक्ती जखमी

रावेर : रावेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी दोन ते चार या वेळेत विजांच्या गडगडात जोरदार पाऊस झाला तर तालुक्यातील कोचूर येथील एकाच्या अंगावर वीज पडल्याने तो जखमी झाला. अजीत भिलासिंग परदेशी (रा.कोचूर, ता.रावेर) असे जखमी नाव आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून रावेर शहर व तालुक्यात जोरदार मुसळधार पावसाला सुरूवात झाली तर दुपारी चार वाजेपर्यंत पाऊस सुरू असतानाच शेतात काम करीत असलेल्या अजीत परदेशी यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना तातडीने सावदा येथील सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. रावेर शहरासह अहिरवाडी, केर्‍हाळा भागातदेखील जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे नुकसान किती झाले या संदर्भात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.