रावेर तालुक्यात एकाच दिवशी दोन जणांच्या आत्महत्या

0

रावेर : वेगवेगळ्या घटनेत तालुक्यातील दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अटवाडे येथील राजेंद्र पांडुरंग पाटील (वय 45) याने खानापूरनजीक उड्डाण पुलाजवळ रेल्वेच्या डाऊन लाईनवर आत्महत्या केली. याबाबत मनोहर पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात माहिती दिली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण देशमुख करीत आहे. तर दुसर्‍या घटनेत येथील रेल्वे स्थानक रोडवरील व दत्त मेडिकलचे संचालक महेश दतात्रय पाटील (वय 30) यांनी मानकर प्लॉटमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.