रावेर तालुक्यात आरोग्य विभागाच्या नऊ पथकांकडून सर्वेक्षण

0

रावेर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ युनिट उभारण्याच्या कार्यवाहीसह शहरातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य विभागाच्या 9 पथकांकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग असतांना तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत असून संपूर्ण शहराचे कोरोनाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, राष्ट्रे बाळ स्वास्थ कार्यक्रमाचे आरोग्यसेविका, फार्मासिस्ट यांची बुधवारी बैठक घेऊन सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. शहरातील सर्व भागातील रहिवाशांचे प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी 19 कर्मचार्‍यांची 9 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Copy