रावेर तालुक्यातील लाभार्थींना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान

0

रावेर : रावेर तालुक्यातील गरीब कुटुंबाना राज्य व केंद्र सरकार कडून विशेष अर्थसहाय्य (सानुग्रह) अनुदान मे आणि जून महिन्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली. केंद्र व राज्य सरकारतर्फे विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थांना कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परीस्थिती लक्षात घेता इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती योजना या सर्व योजनांतील लाभार्थींना मे आणि जुन या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे एक हजार रुपये (सानुग्रह) विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.