रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणार -नंदकिशोर महाजन

0

तर विकासकामे होणार ; 14 व्या वित्त आयोगाचा निधी मार्गदर्शनाअभावी पडून

रावेर- तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात मिळालेला निधी योग्य तांत्रिक मार्गदर्शनाअभावी ग्रामपंचायतीत पडून आहे. 14 वा वित्त आयोग, दुष्काळग्रस्त तालुका घोषीत झाल्याने पाणीटंचाई कमी करण्याबाबत चर्चा, दलित वस्ती सुधार निधी, तांडवस्ती सुधार निधी, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, घरकूल 2022 पंतप्रधान आवास योजना, घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे अशा अनेक विषयासंदर्भात अडीअडचणी ग्रामपंचायतीकडून जाणून घेवून काम करण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी महिनाभरात रावेर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देवून दौरा करणार असल्याचे जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सांगितले. ग्रामपंचायती सक्षम व्हाव्या यासाठी सरळ पंचायतीला मोठ्या प्रमाणात 14 वा वित्त आयोग निधी दिला जात आहे परंतु योग्य तांत्रिक मार्गदर्शनाअभावी तो पडून आहे तसेच रावेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने पाणीटंचाईचे संकट भेडसावणार असल्याने ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी जाणून घेणे, दलित वस्ती सुधार योजनेतील अपूर्ण कामे, अपूर्ण घरकूल कामे, अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन तांडावस्ती सुधार यासह अन्य योजनांवर येणार्‍या निधीचा योग्य वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला महिनाभरात जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी एच.एन.तडवी, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बांधकाम शाखा अभियंता के.व्ही.महाजन, वीजतांत्रिक अधिकारी अतुल कापडे भेटी देवून बैठका घेणार आहेत.