रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या न सुटल्यास सामूहिक राजीनामे !

0

दुकानदारांतर्फे तहसीलदारांना निवेदन : खोट्या तक्रारींमुळे दुकानदारांना काम करणे कठीण

खिर्डी : रावेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या अडी-अडचणी न सुटल्यास सर्व दुकानदार सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी रावेर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून संपूर्ण देशात तसेच राज्यावर आपात्कालीन परीस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परीस्थितीत शासन व प्रशासन अतिशय जोमाने सदर परीस्थितीचा मुकाबला करीत आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाचे विभागापैकी जीवनावश्यक कायद्यांतर्गत सार्वजनीक वितरण प्रणालीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून संपूर्ण राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार आपल्या जीवाची व कुटूंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून आपले हे कर्तव्य म्हणून सेवा बजावात आहे परंतु प्रामाणिकपणे स्वस्त धान्य दुकानदार आपले कर्तव्य बजावत असतांना गावातील काही लोकांकडून स्वार्थापोटी व द्वेषभावनेतुन राजकीय डावपेचातून कार्डधारकांच्या भावना भडकावून स्वस्त धान्य दुकानदारांबद्दल कार्डधारकांना चुकीची माहिती देणे, दुकानदारांना ब्लॅकमेल करणे तालुका तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी यांना निनावी फोनद्वारे चुकीच्या तक्रारी करीत असल्याने रावेर तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई झाली आहे. तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार वरील प्रमाणे खोट्या तक्रारींमुळे दुकानदारांवर चौकशी व तक्रारींची दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना अश्या परीस्थितीत वाटप करणे जिकरीचे झाले असल्याचे निवेदनात नमूद आहे.

अशा आहेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या
सध्या प्रचलित नियतन हे अन्न सुरक्षा कायदा 2013 अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2013 पासून यांद्या मंजूर आहेत परंतु गावातील प्रत्येक कुटूंबात लोकांची संख्या वाढल्याने जुन्या याद्या प्रमाणे धान्य साठा मिळत आहे त्यामुळे ऑनलाईन प्रमाणे वाढीव लाभार्थींचे धान्य मिळावे, 2013 चे नियतनाप्रमाणे धान्य मिळत असल्यामुळे दमानवाला वाटपासाठी धान्य कमी पडत आहे ते वाढवून मिळावे, शासकीय गोदामातून दुकानदारांना प्राप्त होणारे धान्य 50 किलो धान्य व 650 ग्रॅम रीकामी गोणी असे एकूण वजन 50.650 किलो मिळणे अपेक्षीत आहे, प्रत्येक गोणीत एक ते दीड किलो म्हणजेच क्विंटलला 2 ते 3 किलो धान्य कमी मिळत आहे म्हणजेच प्रत्येक दुकानदाराला प्रती 100 क्विंटल धान्याला 2 ते 3 विंटल धान्य कमी मिळत आहे याबद्दल शासकीय गोदामपाल यांना जॉ विचारला असता त्यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून येणार्‍या धान्यात प्रत्येक गाडीत धान्य कमी येते त्यामुळे मला पुर्ण धान्य देता येणे शक्य नाही, असे सांगितले जाते आणि ही घट आम्ही कशी भरून काढावी त्याबाबत समस्या सोडावी. वरील निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थतीत आम्ही आपल्या व शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून धान्याची वाटप करू कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेवू, अशी आपणास ग्वाही देतो, असे निवेदनात नमूद आहे

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर रावेर तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, रवींद्र बगाडे, सचिव दिलीप साबळे, विठ्ठल पाटील, सदाशिव झांबरे, देविदास महाजन, आत्माराम कोळी, मोहन महाजन, किशोर पाटील आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व दुकानदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Copy