रावेर तालुका कृषी कार्यालयात चोरी

0

रावेर । येथील तालुका कृषी कार्यालयात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे आजुबाजुच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुका कृषी कार्यालयात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा तोडून सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, हार्डडिस्क असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. येथील कार्यालयीन लिपीक रवी गुणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.