Private Advt

रावेर तहसीलमधून भरदिवसा वाळूचे ट्रॅक्टर पळवले

रावेर : रावेर तहसील कार्यालयातुन महसूल पथकाने अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रावेर शहरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी यासीन तडवी, तलाठी दादाराव कांबळे व कोतवाल गणेश चौधरी यांनी मदीना कॉलनी येथून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली एम.एच.19-0880 पकडले व पोलिस बंदोबस्तात रावेर तहसील कार्यालयात आणले होते. सुमारे दोन तासाने म्हणजे दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून जप्त केलेले वाळु ट्रक्टर अज्ञात चालकाने पळवुन नेल्याची बाब समोर येताच मोठी खळबळ उडाली. रावेर पोलिस स्थानकात तलाठी दादाराव कांबळे यांच्या फिर्यादीवरुन तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.