रावेर तहसीलदारांचा ‘कोरोना वीरांगना’ पुरस्काराने सन्मान

0

रावेर : मागील महिन्यापासून आपलं कुटुंब, संसार सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, नागरीकांसाठी प्रबोधन, बाधीतांना वेळेवर अचूक योग्य उपचार यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करून रात्रंदिवस झटणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सत्कार फैजपूर येथील सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे सावदा येथील जफर लॉनमध्ये करण्यात आला. त्यात रावेर तहसीलदार उषाराणी देवगणे यांचाही ‘कोरोना वीरांगना’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. या कार्यक्रमात ‘मानवसेवा परमो धर्मः’ ही हाजी शब्बीर हुसेन हाजी अखतर हुसेन उर्फ बाबू शेठ यांच्या कार्यावर आधारीत चित्रफितीचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले.

Copy