रावेर तहसिलवर भोई समाजाचा मोर्चा

0

रावेर : शहरातील भोई समाजाची दफनभूमी ही शासन दप्तरी नोंद झाली पाहिजे या मागणीसाठी गुरुवार 5 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार विजयकुमार ढगे मागणीचे निवेदन यांना देण्यात आले. येथील भोई वाड्यापासून मोर्चाला सुरुवात झाली व तहसील कार्यालयावर समारोप करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रल्हाद महाजन, अ‍ॅड. सूरज चौधरी, प्रकाश मुजुमदार, भास्कर पहेलवान, अशोक शिंदे, भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव भोई, बाळासाहेब भोई, एस.ए. भोई आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

मोर्चाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी घेतले परिश्रम
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी संजय भोई, नितिन महाजन, अक्षय कासार, संतोष भोई, काशीनाथ महाराज, गोपाल भोई, केशव भोई, शिवलाल भोई, कैलास भोई, प्रकाश भोई, संतोष भोई, सुनील भोई, दशरथ भोई, अर्जुन भोई, दिनेश भोई, संजय भोई, राजू भोई, राहुल मुजुमदार, देविदास भोई, गजानन भोई, ईश्वर भोई, योगेश भोई, जगदीश भोई, गणेश भोई, दीपेश भोई, प्रेम भोई, देविदास भोई, निर्मला भोई, कलाबाई भोई आदींनी परिश्रम घेतले.