Private Advt

रावेर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतर 15 लाखांची खंडणी मागितली आरोपींची कारागृहात रवानगी

रावेर : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करण्यात आला शिवाय अल्पवयीन मुलीच्या वडीलांना प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा लाखांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला होता. या प्रकरणी तिघा तरुणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघा आरोपींना अटक करण्यात आली होती तर आरोपींना सुरुवातीला 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.

तिघा आरोपींची कोठडीत रवानगी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच मुलीची बदनामी करू अशी धमकी देत पंधरा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी जयेश मोतीलाल सपकाळे (रा.आदर्श नगर, रावेर) व त्याचे साथीदार गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे (दोन्ही रा.रावेर) यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना गुन्हा दाखल केल्यानंतर रावेर पोलिसांनी अटक केली होती व न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची जळगाव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.