रावेरात 25 गुरांची कत्तलीपूर्वीच सुटका : चालक पोलिसांना पाहताच पसार

रावेर : कत्तलीच्या उद्देशाने 25 गुरांना कोंबून होणारी वाहतूक रावेर पोलिसिांनी रोखत गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक जप्त करीत गुरांची सुटका केली तर ट्रक चालक पसार झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
25 गुरांना निर्दयीपणे भरुन ट्रक (एम.एच.18 बी.जी.3683) हा अवैधपणे गुरांची वाहतूकीच्या संशयावरुन लोकांनी थांबवला. सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनावरुन ट्रकवर चढून पोलीस कर्मचारी मुकेश सोनवणे, विशाल पाटील, अमोल जाधव यांनी ट्रकवरील तारपत्री काढली असता ट्रकमध्ये सुमारे 25 गायी, वासरी, बैल, हे कोंबून भरलेले होते.ट्रक व गुरे असे एकूण 6 लाख 18 हजाराचे पशुधन रावेर पोलिसांनी जप्त केले असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.