रावेरात हेल्पलाईन क्रमांक लागेना : रुग्णांची गैरसोय

रावेर : रावेर तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार येथील ग्रामीण रुग्णालयात हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असलातरी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हा क्रमांक लागतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरीकांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेल्पलाईन क्रमांक लागत नसल्याची ओरड
बेड मिळत नसल्याने तालुक्यातील रुग्णांनी जळगाव, भुसावळ ऐवजी बर्‍हाणपूरचा पर्याय निवडला होता मात्र बर्‍हाणपूरच्या हॉस्पिटलला जळगाव येथून होणारा ऑक्सिजन पुरवठा राऊत यांनी बंद केला त्यामुळे या हॉस्पिटलने तालुक्यातील रुग्ण घेण्यास बंदी आणली. जिल्हाधिकारी राऊत यांनी रावेर तालुक्यातील व परीसरातील रुग्णांवर जिल्ह्यात उपचार होतील, जिल्ह्यात कोठे किती बेड शिल्लक आहे याची माहिती देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हेल्पलाईन क्रमांकासह मदत कक्ष उभारण्याचे तहसीलदार यांना आदेश दिले होते. ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेला हेल्पलाईन क्रमांक कुचकामी ठरला आहे. बुधवारी हेल्पलाईन क्रमांक 02584-250573 या क्रमांकावर फोन लावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असत दिवसभर हा क्रमांक लागत नव्हता त्यामुळे दिलेला हेल्पलाईन क्रमांक जर लागतच नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या संदर्भात प्रशासनाकडून माहिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

Copy