Private Advt

रावेरात शिवसेनेचे निवेदन

रावेर : आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशाशी प्रतारणा केल्याने त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व अटक करून त्यांना कारागृहात टाकावे या मागणीसाठी रावेरात गुरुवारी शिवसेनेच्या निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
रावेर तहसील प्रशासनाला निवेदन देताना शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख नितीन (बंटी) महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित, युवा सेना शहरप्रमुख राकेश घोरपडे, कुणाल बांगरे, संतोष महाजन, समाधान महाजन, निलेश महाजन, विजय महाजन, पंकज घोरपडे व शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी, राहुल कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.