रावेरात शासकीय कामात अडथळा : एकास पोलिसांकडून अटक

0

रावेर : ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाबाबत घरोघरी जाऊन नावनोंदणी करत असतांना त्यांच्या कामांत एक व्यक्तीने आडकाठी केल्याने त्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.नीळकंठ महाजन यांनी 9 कर्मचार्‍यांची समिती गठीत केली आली आहे. ही समिती घरोघरी जाऊन आरोग्याची विचारपूस करून नावनोंदणी करत आहेत. समिती सदस्य शनिवार, 25 एप्रिल रोजी अशीच नोंदणी करण्यासाठी गेले असता मदिना कॉलनीतील आयुबखान रफीकखान याने अरेरावीची भाषा करून त्यांचे रजिस्टर हिसकावून त्यावर घेतलेल्या नोंदीत खाडाखोड केली व सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी आरोग्य सेवक कुशल प्रल्हाद पाटील यांनी आयुबखान रफीकखान यांच्या विरोधात शासकीय कामांत अडथळा निर्माण केल्याची रावेर पोलिसात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. तपास एएसआय ईस्माईल शेख करीत आहेत.

Copy