Private Advt

रावेरात वाळूची चोरटी वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा

रावेर : शहरातील स्टेशन रोडवरील जलसिंचन परीसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनावर पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या आदेशानंतर कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली.

गस्तीवर असताना पकडले ट्रॅक्टर
रावेर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जलसिंचन परीसरात मध्यरात्री पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे हे गस्तीवर असतांना दोन वाजेच्या सुमारास त्यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने संशयीत आरोपी चालक शाहरूख खान हमीद खान (25, रा.कौसर मशीदजवळ, रावेर) व मालक शेख दानिश शेख अनिस (19, रा.मदिना कॉलनी, रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच वाळूने भरलेले ट्रक्टर रावेर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अलताफ अली असन अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार ईस्माईल शेख करीत आहे.