रावेरात मेंढपाळावर कुर्‍हाडीने हल्ला

Shepherd attacked with ax in Rawer रावेर : शहरातील चुनाभट्टी रस्त्यावरील पुलाजवळ मेंढपाळावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी रावेर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
सुकलाल विठ्ठल चोरमाले (27, मुंजलवाडी, ह.मु.चुनाभट्टी, सुबा शिवार. रावेर) यांना हुसेन नाजीर तडवी (कुसुंबा, ता.रावेर) यांनी कुर्‍हाडीचा दांडा मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी तडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.