Private Advt

रावेरात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा जाळली : राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा

रावेर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्याचा निषेध म्हणून रावेर तहसील कार्यालयाजवळ राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी फडणवीस यांची गुरुवारी दुपारी 12.30 वाजता प्रतिमा जाळली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी तसेच सोशल डिस्टन्स व जमावबंदी आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
पोलीस नाईक पुरूषोत्तम नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी युवा तालुकाप्रमुख सचिन रमेश पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ नारायण चौधरी (खिरवड), शहराध्यक्ष शेख मेहबुब शेख मेहमुद मन्यार, कुणाल प्रकाश महाले (रा.पीपल्स बँक कॉलनी, जुना सावदा रोड, रावेर), राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष दीपक संतोष पाटील यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ईस्माईल शेख करीत आहेत.