रावेरात भाजपाचे शंख व घंटानाद आंदोलन

रावेर : शहरात भाजपातर्फे मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिमंदिर व महादेव मंदिराबाहेर सोमवारी घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले. लाखो लोकांची उपजीविका धार्मिक स्थळांवर मंदिरांवर अवलंबून असून मंदिर बंद ठेवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकार त्यांना आर्थिक मदत करीत नाही व मंदिरे उघडी करीत नाही. देशातील अन्य राज्यातील मंदिरे याआधीच उघडी करण्यात आली आहे परंतु राज्यातील देव-धर्म विरोधी आघाडी सरकारने त्यावर कुठलीही दखल घेतली नसल्याने गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार इशारा देण्यासाठी रावेर तालुका भारतीय जनता पार्टी व अध्यात्मिक आघाडीतर्फे ‘दार उघडा उद्धवा दार उघड’ अशी हाक देवून घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
प्रसंगी भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, कृउबा समिती माजी सभापती श्रीकांत महाजन, पंचायत समितीचे माजी उपभापती जुम्मा तडवी, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संतोष महाराज, सुनील पाटील, संदीप सावळे, प्रवीण पाचपोहे, सूर्यकांत देशमुख, माजी शहराध्यक्ष मनोज श्रावक, शहर सरचिटणीस रवींद्र पाटील, कि.मो.तालुकाध्यक्ष राहुल महाजन, नथ्थू धांडे, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, बाळू महाजन, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर, मोहन बोरसे, उमेश कोळी, संजय बुआ, सुधाकर मिस्त्री, परमेश्वर सोनार, माधव चौधरी, लखन पाटील, भाजपा व आध्यात्मिक आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy