रावेरात बंद घर फोडले ; 30 हजारांची रोकड लंपास

रावेर : शहरातील स्टेशन रोडवरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील 30 हजार रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय भरतलाल जयस्वाल (31, रा.भागीरथी नगर, अकोला, ह.मु.रेल्वे स्टेशनरोड रावेर) हे युनियन बँकेत नोकरीस असून शनिवार, 13 नोव्हेंबर दुपारी 3 ते 15 नोव्हेंबर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराचा कडी-कोयंडा तोडून लोखंडी कपाटातून 30 हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी अक्षय जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.

Copy