रावेरात बंद घरातून 30 हजारांची रोकड लांबवली

रावेर : घरात कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने 30 हजारांची रोकड लांबवली. ही घटना रावेर शहरातील मदिना कॉलनीत घडली. रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर शहरातील मदिना कॉलनीतील रहिवासी मोहम्मद युनूस शेख कलिम सोमवार, 6 रोजी बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने संधी साधत घरातून 30 हजारांची रोकड लांबवली. याबाबत रावेर पोलिस स्थानकात मोहम्मद युनूस यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि 380 व 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.

Copy