Private Advt

रावेरात पशूधनाची चोरी : दोघांना अटक

रावेर : माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी यांच्या मालकीच्या गोठ्यातून पशूधनाची चोरी केल्याप्रकरणी दोघांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. शकिल सलीम शेख (27, कुरेशी वाडा, रावेर) व अशपाक गफार शेख (23, पाण्याच्या टॉकीवळ, रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पशूधनाची केली होती चोरी
रावेरातील स्टेशन रोडवरील एका पेट्रोल पंपानजीक माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी यांच्या राहत्या घरामागील बाजूस गुरांचा गोठा असून त्यातून 27 फेब्रूवारी ते 10 मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा बैल व 20 हजार रुपये किंमतीची एक जर्सी जातीची वासरी चोरुन नेली होती.रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मेढे, समाधान ठाकूर, विकार शेख, प्रमोद पाटील, अमोल जाधव यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयीतांच्या मुसक्या आवळल्या. तपास पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहेत.