रावेरात नारायण राणेंचा निषेध : निषेध मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन

रावेर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविवरोधात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अतिशय खालच्या पातळीवर टिका केल्याचे पडसाद मंगळवारी सर्वत्र उमटले. रावेर तालुका शिवसेना व युवा शाखेतर्फे राणे यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. पीपल्स बँकेजवळून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुका संघटक अशोक शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील, राकेश घोरपडे, अलताफ बेग, विजय पाटील, पिंटू माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे यांच्या मुर्दाबादच्या घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.