Private Advt

रावेरात दिड लाखांचे मंगळसूत्र लांबवले

रावेरातील श्री महालक्ष्मी अलंकार सराफा दुकानातील प्रकार : चोरट्या सीसीटीव्हीत कैद

रावेर : दागिने घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा अज्ञात बहाण्याने सराफा दुकानातून दिड लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घअना सोमवार, रोजी पावणेचार वाजता घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हातचलाखीने लांबवले मंगळसूत्र
या संदर्भात सराफा व्यापारी नरेंद्र भगवान सोनार (40, राजू पाटील नगर, रावेर) यांनी रावेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास सोनार हे श्री महालक्ष्मी अलंकार हे दुकान बंद करीत असतानाच त्यांना एक मंगळसूत्र कमी आढळले. या संदर्भात खातरजमा करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी हातचलाखी करीत मंगळसूत्र चोरल्याचे लक्षात आले. 38.500 ग्रॅम वजनाचे व दिड लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.