रावेरात तोतया पोलिसांनी वृद्ध शेतकर्‍याला 18 हजारात गंडवले

रावेर : बैल विकून मिळालेले 18 हजार रुपये बँकेत ठेवण्यासाठी तसेच मुलीसाठी दिवाळीनिमित्त काही वस्तू खरेदीसाठी रावेर शहरात आलेल्या वृद्ध शेतकर्‍याला तोतया पोलिसांनी गाठून गांजा तपासणीच्या बहाण्याने 18 हजारात गंडवले. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गांजा तपासणीच्या बहाण्याने गंडवले
रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील चिंधू तोताराम धनगर (65) या शेतकर्‍याने 18 हजार रुपयांत बैलाची विक्री करून ती रक्कम बँकेत ठेवण्यासाठी व दिवाळीनिमित्त सामान खरेदीसाठी मुलीसह रावेर गाठल ेअसता रावेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तोतया पोलिसांनी चिंधू धनगर यांना गाठले. तुम्ही गांजाची तस्करी करत असल्याची खबर आम्हाला मिळाली आहे, तुमची तपासणी करायची असल्याचे सांगून खिशात असलेले बैल विक्रीचे मिळालेले 18 हजार रुपये घेऊन त्या दोन्ही तोतया पोलिसांनी पोबारा केला, अशी तक्रार चिंधू धनगर यांनी रावेर पोलिसांत दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या पूर्वीही शहर व तालुक्यात तोतया पोलिसांकडून नागरीकांची फसवणूक झाल्याच्या तीन घटना घडल्या आहे . पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तोतया पोलिसांचा शोध घेतला जात आहे.

Copy