रावेरात तरुणाचा खून : चौघा आरोपींना अटक

0

रावेर : शहराजवळ झालेल्या तरुणा खून प्रकरणाचा गुन्ह्याचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी खून केल्याची कबूलीदेखील दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे. सौरभ गणेश राऊत (22, गेवराई, जि.बीड) असे मयताचे नाव आहे. 2 रोजीच्या रात्री बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेली एक पानटपरीत मयत सौरभ हा चोरी करीत असल्याच्या संशयावरुन आरोपी महेश विश्वनाथ महाजन,भैय्या धोबी, विकास गोपाळ महाजन,विनोद विठ्ठल सातव यांनी मयत सौरभ याला मोटरसायकलवर बसवून गोवर्धन नगरात नेले व तेथे मारहाण करून रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून त्याचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली.

तपास कामात यांचा होता सहभाग
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव, पोलिस कर्मचारी बिजू जावरे नंदकिशोर महाजन, प्रदीप सपकाळे, महेंद्र सुरवाडे, निलेश चौधरी, सुकेश तडवी, सुरेश मेढे, मंदार पाटील, विशाल पाटील, सचिन गुघे, प्रमोद पाटील, पुरूषोत्तम पाटील, सुनील वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Copy